Vaze Recreates Crime Scene | NIA ,फॉरेन्सिक टीमकडून सचिन वाझेंना घटनास्थळी आणून रिक्रिएशन

मुंकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना कुर्ता घालून चालण्यात आलं (NIA Recreates Crime Scene near Antila Sachin Vaze made to walk)

चेतन पाटील

|

Mar 20, 2021 | 12:01 AM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावर एनआयएकडून कसून तपास सुरु आहे. विशेष म्हणजे आज रात्री जवळपास दहा वाजेच्या सुमारास एनआयए आणि फॉरेन्सिक टीम थेट घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना कुर्ता घालून चालण्यात आलं (NIA Recreates Crime Scene near Antila Sachin Vaze made to walk). मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती पीपीई किटमध्ये चालताना दिसला होता. एनआयएकडून त्याच सीनचं आज रात्री रिक्रिएशन करण्यात आलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें