Neelam Gorhe | पालघर जिल्ह्यातील विधवांच्या पुनर्वसनासाठी उपसमिती तयार करा – नीलम गोऱ्हे

पालघर जिल्ह्यातील विधवांच्या पुनर्वसनासाठी उपसमिती तयार करून ग्रामीण भागातील अशा घटकांना कृषी विषयक रोजगार आणि इतर रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना विधानपरिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पालघर येथे जिल्हा प्रशासनाला दिल्या.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Aug 26, 2021 | 9:52 AM

पालघर जिल्ह्यातील विधवांच्या पुनर्वसनासाठी उपसमिती तयार करून ग्रामीण भागातील अशा घटकांना कृषी विषयक रोजगार आणि इतर रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना विधानपरिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पालघर येथे जिल्हा प्रशासनाला दिल्या. याचबरोबरीने त्यांच्या नावे असलेल्या मालमत्ता यांचे संरक्षण व्हावे यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मदत घेऊन महिला बाल विकास विभागाने विधवा महिलांच्या जागा संरक्षित कराव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या. उपसभापती नीलम गोऱ्हे या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें