“संजय राऊत चायनीज मॉडेल शिवसेनेचे नेते”, भाजप नेत्याचा टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीत मुजरा कशाला? हिमंत असेल तर महाराष्ट्रात बसून मंत्रिमंडळ विस्तार करा, असं आव्हान संजय राऊत यांनी केलं. तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेने कधी दिल्लीत मुजरा केला नाही, असंही राऊत म्हणाले.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीत मुजरा कशाला? हिमंत असेल तर महाराष्ट्रात बसून मंत्रिमंडळ विस्तार करा, असं आव्हान संजय राऊत यांनी केलं. तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेने कधी दिल्लीत मुजरा केला नाही, असंही राऊत म्हणाले. यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे चायनीज शिवसेनेचे नेते आहेत. कारण निवडणूक आयोगाने खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या हाती दिली आहे. तसेच खरी शिवसेना दिल्लीत जात नाही म्हणता मग तुमचा मालक जनपथवर किती वेळा गेला? दिल्लीला मातोश्रीची मम्मी आहे का? सीबीआय चौकशीवर बोलता मग श्रीधर पाटणकरबद्दल बोला ना…, असं आव्हानच राणेंनी दिलंय.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

