Nitesh Rane : पिक्चर अभी बाकी हैं; दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंचं सूचक वक्तव्य
Disha Salian Case Update : दिशा सालियन प्रकरणी एसआयटीच्या अहवालावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
दिशा सालियन यांच्या वडिलांनी स्वतःची मुलगी गमावली. ते सुद्धा राजकीय आरोप करणार आहेत का? ते सुद्धा कुणाचे नाव मुद्दाम घेणार आहेत का? त्यांनी स्वतः दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आदींची नावे घेतली आहेत. एक लक्षात घ्या. मी एवढेच सांगेन की, पिक्चर अभी बाकी हैं. पूर्ण पिक्चर अजून संपला नाही. कोर्टाने 16 तारीख दिलेली आहे. त्या तारखेला या प्रकरणात काय होते ते आपण पाहू, अशी सूचक प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय व वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झाले नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी हायकोर्टात दाखल केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. विशेषतः यात त्यांनी आदित्य ठाकरे यांचा या हत्येशी कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर आज मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत सूचक इशाराच दिला आहे. दिशा सालियन प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. त्यावर किती भाष्य करू शकतो याविषयी प्रश्नचिन्ह आहे. मुळात हा फक्त नीतेश राणे किंवा राजकीय आरोपांचा विषय नाही, असंही राणे यांनी म्हंटलं आहे.

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO

ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा

जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
