Jaleel vs Rane : छोटा चिंटू… चिकनी चमेली…जलील यांच्या टीकेवर राणेंचा जिव्हारी लागणारा पलटवार, भौकनेवाले कुत्ते….
अहिल्यानगरमधील MIM सभेदरम्यान इम्तियाज जलील आणि वारिस पठाण यांनी नितेश राणे व संग्राम जगताप यांच्यावर टीका केली. यावर नितेश राणे यांनी "भौकणारे कुत्रे चावत नाहीत" असे म्हणत जोरदार पलटवार केला. या शाब्दिक युद्धात राजकीय नेत्यांमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोप झाले.
अहिल्यानगरमधील कोटला गावामध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर, एमआयएमने (MIM) या ठिकाणी सभा आयोजित केली होती. या सभेतून इम्तियाज जलील आणि वारिस पठाण यांनी भाजप आमदार नितेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्यावर तीव्र टीका केली.
जलील यांनी नितेश राणे यांना “छोटा चिंटू” आणि संग्राम जगताप यांना “चिकनी चमेली” असे संबोधले. त्यांनी “रस्त्यावरच्या कुत्र्यांना पकडले जात नाही” अशी बोचरी टिप्पणी केली. याच टीकेला नितेश राणे यांनी भुकणारे कुत्रे चावत नाहीत या शब्दात प्रत्युत्तर दिले. त्यांनी एमआयएमला नसबंदीवाली पिल्लावळ असे संबोधत वारिस पठाण यांना ठिकाण आणि वेळ कळवण्याचे आव्हान दिले, तसेच “आम्ही तुमच्या बापाच्या बापाला सोडले नाही, तर तुम्ही चिल्लर काय चीज आहात?” असे म्हटले.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

