Special Report | Nitesh Rane यांच्या जामिनावर उद्या सुनावणी…जामीन की कोठडीच ? tv9

नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करण्यात आल्याची माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना रुग्णालयात ठेवलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Feb 04, 2022 | 9:05 PM

सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे यांना आज कोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचा अवधी संपल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हा पोलिसांकडून 8 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करण्यात आल्याची माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना रुग्णालयात ठेवलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी जोरदार टोला लगावलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें