Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा
दादर येथील अमरहिंद मंडळाच्या ७८व्या वसंत व्याख्यानमालेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी 2 मोठ्या घोषणा केल्या आहेत. आता जितका प्रवास, तितकाच पथकर द्यावा लागेल. या नवीन धोरणाची अंमलबजावणी १५ दिवसांत केली जाईल, असं गडकरी यांनी म्हंटलं आहे. तसंच पथकर नाक्यांवर वाहनांना थांबावे लागू नये, यासाठी उपग्रहआधारित पथकराची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दादर येथील अमरहिंद मंडळाच्या ७८व्या वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते.
पुढे बोलताना गडकरी यांनी सांगितलं की, रस्ते बांधणीसाठी यंदा ३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून नवे रस्ते बांधले जात असताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांच्या रस्त्यावर जितके किलोमीटर गाडी चालवली जाईल, तितकाच पथकर घेतला जाईल, असे धोरण लवकरच आणण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

