मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू…काय म्हणाले गडकरी
नागपूरमधील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारीता आणि राजकारणातील नैतिकतेवर भाष्य केले. मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे. माझ्या पक्षाने मला हव ते सगळं दिलेले आहे. ज्याचा मी माझ्या स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. त्यामुळे अशा कोणत्याच प्रस्तावाला मी बळी पडत नाही असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की लोकसभा निवडणूकीच्या आधी विरोधी पक्षातील एका नेत्याने मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती. तुम्ही जर पंतप्रधान होणार असाल तर आमचा तुम्हाला पाठींबा असेल असे या नेत्याने सांगितले. परंतू मी त्यांना सांगितले की मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का देत आहात? आणि मी तुमचं समर्थन का घेऊ? मी त्यांना सांगितलं की पंतप्रधान बनने हे काही माझ्या आयुष्याचे ध्येय नाही.मी माझी संघटना आणि ध्यैयासाठी प्रामाणिक आहे. आपले ध्यैयावर आणि माझ्या विचारधारेवर माझी श्रद्धा आहे. मी माझ्या विचारधारेवर चालत राहील, असं म्हणत गडकरींनी राजकारणात ध्यैय ठरवून काम करणारे आणि पत्रकारितेत ध्यैयानुसार काम करणाऱ्या समाजाने मदत केली पाहीजे असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.