AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari | ... खरंतर या गोष्टीसाठी अनिल देशमुखांचे आभार - नितीन गडकरी

Nitin Gadkari | … खरंतर या गोष्टीसाठी अनिल देशमुखांचे आभार – नितीन गडकरी

| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 2:56 PM
Share

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत. त्यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप आहे. या वसुलीप्रकरणावरून भाजपच्या राज्यातील नेत्यांनी देशमुखांना चांगलंच टार्गेट केलं होतं. मात्र, भाजपचेच नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी थेट अनिल देशमुखांचे आभार मानले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत. त्यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप आहे. या वसुलीप्रकरणावरून भाजपच्या राज्यातील नेत्यांनी देशमुखांना चांगलंच टार्गेट केलं होतं. मात्र, भाजपचेच नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी थेट अनिल देशमुखांचे आभार मानले आहेत. एका रस्त्याच्या कामात अनिल देशमुख यांनी मदत केल्याची आठवण काढत नितीन गडकरी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

काटोल नगर परिषदेने रविवारी विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घघाटनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यावेळी नितीन गडकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तेव्हा त्यांनी ही देशमुखांचे आभार मानले. नागपूर ते काटोलच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात वन विभागाने खोडा घातला होता. तेव्हा अनिल देशमुख साहेबांनी मदत केली म्हणून फॉरेस्टचं क्लिअरन्स मिळालं. त्यांचंही मी आभार मानतो. नाही तर क्लिअरन्स मिळतच नव्हतं. त्यामुळे येणाऱ्या काळात अडचणी दूर करून हा रस्ता पूर्ण होईल, असं सांगतानाच नागपूरमध्येही हा रस्ता चारपदरी करून एक दोन ठिकाणी उड्डाण पूलही करणार आहोत. नागपूरच्या रिंगरोडचं काम कॉन्ट्रॅक्टर टर्मिनेट करून नवी कॉन्ट्रॅक्टरने करायला घेतलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे सर्व रस्ते पूर्ण होतील, असं गडकरी म्हणाले.