मृत्यूपत्रात कुठे काही घोळ होऊ नये म्हणून नितीन गडकरी यांचे नाव, Datta Meghe यांनी उलगडलं गुपित

राजकारणात अनेक व्यक्ती नात्यापलीकडच्या असतात. त्यांच्यावर प्रचंड विश्वास असतो. ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दत्ता मेघे यांच्या बाबतीत दिसते. मृत्युपत्रात कुठं काही घोळ होऊ नये, कसलीही अडचण येऊ नये याकरिता दत्ता मेघे यांच्या मृत्युपत्रात नितीन गडकरी यांचं नाव लिहिलं असल्याचं गुपित खुद्द माजी खासदार दत्ता मेघे यांनीच जाहीररीत्या उघड केलं.

राजकारणात सध्या एकमेकांबद्दलचा आदर, सन्मान, मोठेपणा हे शब्द परावलीचे झाले आहेत. सध्या एकमेकांवरची चिखलफेक एवढी वाढली आहे की राजकारण चांगलं आहे, असं म्हणणंही चुकीचं ठरेल की काय अशी शंका येते. पण ऐंशी नव्वदच्या दशकातलं राजकारण वेगळं होतं. एकमेकांबद्दल आदर सन्मान ठेवला जायचा, भलेही मग तो विरोधी पक्षातला का असेना. देशात आणि महाराष्ट्रात अशी बरीच राजकारणविरहित मैत्रीची उदाहरणं देता येतील. अशीच मैत्री आहे एकेकाळचे काँग्रेस नेते माजी खासदार पण सध्या भाजपत असलेले दत्ता मेघे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…! यांच्या मैत्रीबद्दल सांगायचं कारण म्हणजे दत्ता मेघे यांच्या मृत्यूपत्रात चक्क नितीन गडकरी यांचं नाव आहे. खुद्द दत्ता मेघे यांनीच याबद्दलची माहिती एका कार्यक्रमात दिली.

राजकारणात अनेक व्यक्ती नात्यापलीकडच्या असतात. त्यांच्यावर प्रचंड विश्वास असतो. ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दत्ता मेघे यांच्या बाबतीत दिसते. मृत्युपत्रात कुठं काही घोळ होऊ नये, कसलीही अडचण येऊ नये याकरिता दत्ता मेघे यांच्या मृत्युपत्रात नितीन गडकरी यांचं नाव लिहिलं असल्याचं गुपित खुद्द माजी खासदार दत्ता मेघे यांनीच जाहीररीत्या उघड केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI