Pune | सत्कार म्हणजे एक क्रांती आहे, Kirit Somaiya यांचा मविआच्या नेत्यांना टोला

हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रमाणे (Santaji Ghorpade) गडहिंग्लजमधील आप्पासाहेब नलावडे (Appasaheb Nalawade) या कारखान्यातही बोगस कंपन्यांद्वारे घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नवा आरोप केला आहे. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रमाणे गडहिंग्लजमधील आप्पासाहेब नलावडे या कारखान्यातही बोगस कंपन्यांद्वारे घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. आप्पासाहेब नलावडे कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या जावयाचंही नाव घेतलं आहे.

यानंतर पुण्याच ओबीसी मोर्चाकडून सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किरीट यांनी हसन मुश्रीफांना आता कोणीही वाचवू शकत नाही असं म्हटलं आहे. तसचं संपूर्ण महाराष्ट्र हा भ्रष्टाचारमुक्तीकडे चालला असल्याचंही सोमय्यांनी सांगितलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI