लग्नात घोड्यावर बसवलं नाही आता रथात बसवलं..काय म्हणाले अजित पवार
अजितदादा पवार यांना फोडून भाजपाने आपल्या सोबत घेतले असले तरी त्यांचा विशेष फायदा काही झालेला नाही. त्यामुळे अजितदादांच्या विरोधात भाजपातील एक गट कायम आहे. अजितदादा पवार यांनी आता विधान सभेसाठी जनसन्मान यात्रा काढली आहे. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथे जनसन्मान यात्रा काढली आहे. येथे नववधू आणि वराला लग्नात जसं घोड्यावर बसवतात. तसेच आता माणिकरावांनी आम्हाला रथात बसविले आहे. आमच्या जनसन्मान यात्रेचे स्वागत नाशिकमध्ये चांगले झालेले आहेत. सकाळपासून माझ्या भगिनींनी मला इतक्या राख्या बांधल्या आहेत असे म्हणज अजितदादा पवार यांनी कामगारांच्या मेळाव्यात आपला राख्यांनी भरलेला हात उंचावून दाखविला. या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी लाडकी बहीण योजनेला निधी कमी पडू देणार नाही. आपले राज्य इतके पुढारलेले आहे. आणि गेली अनेक वर्षे या राज्याचा अर्थसंकल्प मांडणे हे काही येऱ्या गबाळ्याचं काम नाही. त्यामुळे बहिणींनी काहीही चिंता करु नये असा सल्ला यावेळी अजितदादा पवार यांनी दिला आहे.
Latest Videos
Latest News