AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी; राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी; राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Sep 23, 2024 | 4:45 PM
Share

राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. अशातच प्रत्येक पक्षात मोठ-मोठ्या हालचाली घडताना दिसताय. अशातच ठाण्यात मोठी राजकीय खेळी होणार का? राज ठाकरेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अभिजीत पानसे यांना उमेदवारी द्या, तर ठाणे शहरातून अविनाश जाधव यांना उमेदवारी द्या… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची राज ठाकरे यांच्याकडे ही शिफारस केली. या बैठकीत मुंबई, ठाणे आणि पुण्यातील जागांच्या अहवालावर चर्चा पूर्ण झाल्याचे कळतंय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची विभागनिहाय बैठक होती. ठाणे हा भाजप आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. यामध्ये एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून आलेले आणि आता मुख्यमंत्रीपदावर विराजमान असलेले एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता मनसेचे अभिजीत पानसे यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी, अशी मनसेची आग्रही मागणी राज ठाकरे यांच्याकडे मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. यासोबतच ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी शिफारस मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडे केली आहे. ठाण्यातील मतदारसंघात मनसे उमेदवारानं आपलं नशीब आजमावलं होतं. पण गेल्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांचा भाजपच्या संजय केळकर यांच्यासमोर पराभव झाला होता.

 

 

Published on: Sep 23, 2024 04:45 PM
Follow Us