Chandrakant Patil | Chandrakant Patil Live | माझी खुशाल तक्रार करा – चंद्रकांत पाटील

हसन मुश्रीफ यांनी सोमय्यांना प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्यावर आरोप केलाय. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यासाठी माझं नाव म्हणजे झोपेची गोळी आहे,त असा टोला लगावलाय.

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. सोमय्यांच्या या आरोपानंतर आता राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी सोमय्यांना प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्यावर आरोप केलाय. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यासाठी माझं नाव म्हणजे झोपेची गोळी आहे,त असा टोला लगावलाय. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचा घोटाळा समोर आणला. माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. ते माझे मित्र आहेत. माझं नाव हे त्यांच्यासाठी झोपेची गोळी आहे. मित्राला माझं नाव घेतल्यावर चांगली झोप लागत असेल तर हरकत नाही. ते 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. त्या ऐवजी त्यांनी 500 कोटींचा दावा दाखल करावा. अब्रुनुकसानीचा दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते, त्यासाठी व्हाईट मनी आहे का? असा खोचक सवालही पाटील यांनी केलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI