मंत्रालयातील फोटो प्रसार माध्यमांवर कसे आले? नगरविकास विभागाची Kirit Somaiya यांना नोटीस

प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतल्याचं बोललं जात आहे. मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या दालनात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल पाहतानाचा सोमय्यांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 25, 2022 | 7:05 PM

मुंबई : किरीट सोमय्या यांचा नगरविकास खात्यात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईली तपासतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे. सोमय्यांच्या या कृतीबाबत काँग्रेसनं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर आता सोमय्या यांनी फाईल दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नगरविकास खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतल्याचं बोललं जात आहे. मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या दालनात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल पाहतानाचा सोमय्यांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले होते. तर सोमय्या यांनी झालेला प्रकार नियमबाह्य नसल्याचा दावा केला होता.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें