FasTag Video : तुमच्या कारला फास्टटॅग आहे का? असेल तर हा व्हिडीओ बघाच, कारण 1 एप्रिलपासून…
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, १ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टटॅग बंधनकारक करण्यात आला आहे.
फास्ट टॅग सक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व टोलनाक्यांवर एक एप्रिलपासून प्रत्येक वाहन धारकांना फास्टटॅग अनिवार्य असणार आहे. मात्र जर तुमच्या वाहनाला फास्टटॅग नसेल तर वाहन धारकांना टोलचे दुप्पट पैसे भरावे लागणार आहे. राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भातील निर्णयाला मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच मंजूरी दिली होती. आता या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५ पासून करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर १ एप्रिल २०२५ नंतर फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे जर आता तुमच्या वाहनाला फास्टटॅग नसेल तर वाहन धारकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्यापूर्वी फास्टटॅग खरेदी करून त्याचा वापर करावा लागणार आहे. अन्यथा त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...

'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?

'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'

पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
