आता पुढील लक्ष ४५ खासदार आणि २४५ आमदार, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया
पुढील दिवसात महाराष्ट्राला जे अभिप्रेत आहे ते काम आम्ही करून दाखवू. शिवसेना भाजप युती पुन्हा एकदा महाराष्ट्रात आली आहे. पुढच्या काळात ही एकजूट कायम राहील आणि पुन्हा चांगले सरकार मिळेल.
पुणे : मनापासून अभिनंदन करतो. जनप्रतिनिधी कुणाकडे जास्त याकडे निर्णय झाला आहे. जास्त मतदान कुणाकडे आहे हे पाहिले जाते. ज्या बाबी स्पष्ट असेल त्यावर निकाल आला. सत्यमेव जयते असा निकाल आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासातील राजकीय निर्णयामध्ये आजचा दिवस कोरला जाईल. हा निकालामुळे बहुमताने मान्यता मिळाली आहे. पुढील दिवसात महाराष्ट्राला जे अभिप्रेत आहे ते काम आम्ही करून दाखवू. शिवसेना भाजप युती पुन्हा एकदा महाराष्ट्रात आली आहे. पुढच्या काळात ही एकजूट कायम राहील आणि पुन्हा चांगले सरकार मिळेल. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना चांगले बळ मिळेल. आमचे पुढील लक्ष ४५ खासदार आणि २४५ आमदार निवडून आणणे हेच आहे. येत्या निवडणुकीत आम्ही बहुमताने विजयी होऊ याचा विश्वास आहे, असे बावनकुळे म्हणाले. .
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

