Kunbi Certificates : खाडाखोड नोंदी, कुणबी जातप्रमाणपत्र रद्द होणार! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांच्या बैठकीत ठरलं काय?
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, बनावट किंवा खाडाखोड करून मिळवलेली कुणबी जातप्रमाणपत्रे रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अशी प्रमाणपत्रे देणारे अधिकारी आणि अर्जदार दोघांवरही कारवाई होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत कुणबी जातप्रमाणपत्रांसंदर्भात कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. बनावट किंवा खाडाखोड करून मिळवलेली कुणबी जातप्रमाणपत्रे रद्द केली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एवढेच नाही तर, अशी खोटी प्रमाणपत्रे देणारे अधिकारी आणि ती घेणारे अर्जदार या दोघांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटच्या आधारे सरकारने काढलेल्या जीआरला ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत, जन्मदाखला किंवा वंशावळीच्या दाखल्यामध्ये खाडाखोड आढळल्यास जातप्रमाणपत्र रद्द होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षण उपसमिती प्रत्येक जिल्ह्यात वाटप केलेल्या जातप्रमाणपत्रांची माहिती मागवणार असून, खोटी प्रमाणपत्रे आढळल्यास श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी बैठकीत आक्रमक भूमिका घेतली, सरकारला जाब विचारत जीआर रद्द करण्याची व श्वेतपत्रिकेची मागणी केली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

