Special Report | पुण्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलं

पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) सहा तर पुण्यात (Pune) एकाला ओमिक्रॉनची (Omicron) लागण झाल्याचं रविवारी सायंकाळी स्पष्ट झालं.

पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) सहा तर पुण्यात (Pune) एकाला ओमिक्रॉनची (Omicron) लागण झाल्याचं रविवारी सायंकाळी स्पष्ट झालं. राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची (Maharashtra Omicron Update) संख्या 8 झाली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग सुरू होताचं पुणे महापालिका पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं सीओईपीच्या मैदानावरील जम्बो रुग्णालयाची पाहणी करत रुग्णालय कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जम्बो रुग्णालय 1 जानेवारीपर्यंत न हलवण्याच्या सूचना अजित पवारांनी बैठकीत दिल्या होत्या. महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. पवार यांनी काल पाहणी करून रुग्णालय रेडी पझेशनमध्ये ठेवण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. जम्बो रुग्णालयात एकुण 800 बेडची व्यवस्था आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI