Special Report | फक्त 40 दिवसातच ओमिक्रॉननं जग व्यापलं -tv9

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, ही दुसऱ्या लाटेहून कमी धोकादायक आहे. मात्र सध्याच्या लाटेचा वेग हा दुसऱ्या लाटेहून कैक पटीनं मोठा आहे.

मुंबई : असं म्हटलं जातंय की कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, ही दुसऱ्या लाटेहून कमी धोकादायक आहे. मात्र सध्याच्या लाटेचा वेग हा दुसऱ्या लाटेहून कैक पटीनं मोठा आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात फेब्रुवारी 2021 मध्ये झाली. फेब्रुवारीत सरासरी 15 हजार रुग्ण निघत होते. तो आकडा 1 लाखांपर्यंत जाण्यास एप्रिल महिना उजाडावा लागला होता. म्हणजे दुसऱ्या लाटेत 15 हजार ते 1 लाखांपर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी दीड महिने लागले होते. मात्र सध्या तेच अंतर फक्त 7 दिवसात पार झालंय. 30 डिसेंबरला भारतात 16 हजार रुग्ण निघाले होते आणि फक्त 7 दिवसातच तोच दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा 1 लाख 17 हजारांवर गेलाय.

आतापर्यंतच्या 3 कोरोना लाटांमध्ये कमी दिवसात जास्तीत-जास्त रुग्णसंख्यावाढीचं प्रमाण कसं वाढत गेलं, ते सुद्धा समजून घ्या. पहिल्या लाटेत दिवसाला 1 लाख रुग्ण निघण्यासाठी 119 दिवस लागले होते. दुसऱ्या लाटेत तोच आकडा 1 लाख पर्यंत जाण्यासाठी 45 दिवस लागले. आणि सध्याच्या लाटेत दिवसाला 1 लाख रुग्ण होण्यासाठी फक्त 11 दिवस लागले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI