कर्तव्यपथावर महाराष्ट्रातील स्त्री शक्तीचा जागर, यासह जाणून घ्या देशभरातील प्रजासत्ताक दिनाचे अपडेट्स

हर्षदा शिनकर

Updated on: Jan 26, 2023 | 8:47 AM

दिल्लीतील कर्तव्यपथावर चित्ररथातून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा देखावा साकरण्यात येणार

आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन, देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी पहिल्यांदाच ध्वजारोहण केले. मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आहे. छत्रपती शिवाजी पार्कवर राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा होणार आहे.

दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील स्त्री शक्तीचा जागर कऱण्यात येणार आहे. चित्ररथातून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा देखावा साकरण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्ली सजली आहे. इंडिया गेट आणि संसद भवनावर तिरंगा रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. तर मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मंत्रालय, विधिमंडळ, राज्यभवन आणि सीएसएमटी इमारतींना तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर आज दिल्लीतील कर्तव्यपथावरून तिन्ही दलाच्या कवायतींसह भारताच्या विविधता आणि एकतेचे रथेच्या माध्यमातून जगाला भारताची ताकद दिसणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI