विधानसभा निवडणुका जवळ आल्यात, मराठा समाजाला त्रास देणाऱ्यांना… जरांगे पाटलांचा इशारा काय?
राज्य सरकारने लवकरात लवकर सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. दरम्यान, या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष करू नये, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे. बघा नेमका काय दिला इशारा?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने लवकरात लवकर सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. दरम्यान, या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष करू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. तर सगे-सोयऱ्यांबद्दलच्या अधिसूचनेसंदर्भात सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. मार्ग कढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान मराठा समाजाला त्रास देणाऱ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पाडणार असल्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यांच्यावर टीका तर ज्यांनी विरोध केला त्यांचं मनोज जरांगे पाटील गुणगान गात असल्याचा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी म्हटलं. बघा नेमकं काय सुरू आहे आरोप-प्रत्यारोप?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

