‘मुंबईत शिवसेनाच दादा!,’ संजय राऊतांची डरकाळी
भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्याकडून होत असलेले आरोप आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निकटवर्तीयांची ईडीकडून (ED) झालेली अटक आणि होत असलेली चौकशी या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज थेट भाजप विरोधात डरकाळीच फोडली.
नवी दिल्ली: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्याकडून होत असलेले आरोप आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निकटवर्तीयांची ईडीकडून (ED) झालेली अटक आणि होत असलेली चौकशी या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज थेट भाजप विरोधात डरकाळीच फोडली. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचं काम सुरू आहे. ते भ्रमात आहेत. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी ईडीवरही हल्ला चढवला. ईडीचे सर्वाधिक खटले महाराष्ट्रातच कसे? यूपी, बिहार आणि दिल्लीत कसे नाहीत?, असा सवाल करतानाच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठीचा हा डाव आहे. त्यासाठीच हे षडयंत्र सुरू आहे, असा दावाही राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हा इशारा देतानाच लेटरबॉम्बही टाकला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

