Video | सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट थांबवा, प्रमुख विरोधी पक्षांचं नरेंद्र मोदींना पत्र

मुंबई : संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या लाटेमध्ये रोज लाखो रुग्णांची नोंद होत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्था तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण पडतो आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने कोरोनाची ही दुसरी लाट थोपवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. त्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्र लिहलंं आहे. विरोधकांनी सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचं काम थांबवून त्यासाठी लागणारे पैसै ऑक्सिजन आणि लसीकरणासाठी वापरावेत अशी मागणी विरोधकांनी केली आहे.