AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'सासूमुळे वाटणी झाली अन् सासूच वाट्याला आली'; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

‘सासूमुळे वाटणी झाली अन् सासूच वाट्याला आली’; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

apeksha sakpal
apeksha sakpal | Updated on: Jul 17, 2023 | 1:19 PM
Share

आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक होताना दिसले. यावेळी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात अनेक घोषणाबाजी केल्या.

मुंबई, 17 जुलै 2023 | आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक होताना दिसले. यावेळी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात अनेक घोषणाबाजी केल्या. “घटनाबाह्य आणि कलंकित सरकारचा धिक्कार असो” अशा आशयाचे पोस्टर घेऊन विरोधकांनी सकाळी विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन केले आहे. तसेच “सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली”, “खोके गेले, बोके गेले; सरकारमध्ये ओक्के झाले” अशी जोरदार घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली.

Published on: Jul 17, 2023 01:19 PM
Follow Us