AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलियात घुमले मंगळागौरचे सूर! साता समुद्रापार भारतीय महिलांनी मंगळागौरीचे खेळ खेळत जपली परंपरा

ऑस्ट्रेलियात घुमले मंगळागौरचे सूर! साता समुद्रापार भारतीय महिलांनी मंगळागौरीचे खेळ खेळत जपली परंपरा

| Updated on: Aug 30, 2023 | 12:41 AM
Share

VIDEO | सह्याद्री सिडनी या संस्थेकडून मंगळागौर उत्सवाचे सिडनीत जोरदार आयोजन, ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात महाराष्ट्रीयन कुटुंबीय एकत्र येत साता समुद्रापार भारतीय महिलांनी जपली परंपरा

सिडनी, २९ ऑगस्ट २०२३ | श्रावणात मंगळागौरचा खेळ महिला मोठ्या आनंदाने खेळतात. मात्र हाच खेळ साता समुद्रापार ऑस्ट्रेलियात देखील भारतीय महिलांनी परंपरा जपत आयोजित केला. या खेळात भारतीय महिलांन सोबत विदेशी महिलांनी भाग घेऊन या खेळाचा मनसोक्त आनंद घेतला. सह्याद्री सिडनी या संस्थेने मंगळागौर उत्सवाचे सिडनीत जोरदार आयोजन केले. तर मावळातील नागरिक भारताच्या बाहेर राहून सुद्धा आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतात. सह्याद्री सिडनीच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात महाराष्ट्रीयन कुटुंबीय एकत्र येऊन मंगळागौर चा कार्यक्रम आयोजित केला होता. यावर्षी प्रथमच सह्याद्री सिडनीने फक्त महिलांसाठी या उत्सवाचे आयोजन केलं. जवळजवळ साडेतीनशे महिलांनी त्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि अतिशय दणक्यात मंगळागौर उत्सव साजरा केला. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स या राज्यात कॅम्बल टाउन परिसरात झालेल्या कार्यक्रमासाठी स्थानिक नेत्या कॅरेन हंट या उपस्थित होत्या. भारतीय पद्धतीचा पेहराव करून ऑस्ट्रेलियातील महिला या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या आणि मंगळागौरच्या वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग सुद्धा घेतला. मंगळागौर रील बनवा उखाणे स्पर्धा, वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा – इत्यादी. असे अनेक प्रकारचे खेळ खेळण्यात आले तसेच मंगळागौर डान्स, मंगळागौर चे पारंपारिक खेळ या अनेक खेळांनी कार्यक्रमांमध्ये रंगत आणली.

Published on: Aug 30, 2023 12:41 AM