Sharad Pawar | शेतकऱ्यांच्या हिताच समाजकारण देशात किंवा राज्यात ज्याचं असेल त्याला आपली साथ: शरद पवार

या देशातील 60 टक्के शेतकरी काळ्या मातीशी इमान राखतो. शेतकऱ्यांच्या हिताला आपलं समर्थन आहे. आमची शेतकऱ्यांना साथ आहे. मात्र, शेतीमालाच्या किंमतीसंबंधी गेल्या वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहे.

या देशातील 60 टक्के शेतकरी काळ्या मातीशी इमान राखतो. शेतकऱ्यांच्या हिताला आपलं समर्थन आहे. आमची शेतकऱ्यांना साथ आहे. मात्र, शेतीमालाच्या किंमतीसंबंधी गेल्या वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहे. शेतकरी घरदार सोडून रस्त्यावर बसला आहे. पण देशातील केंद्र सरकार एक वर्षापासून या शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. शेतकऱ्यांना भाजप नेत्यांच्या गाड्यांनी चिरडले आहे. त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे या सरकारला त्यांची जागा दाखवण्याशिवाय गत्यंतर नाही, असं सांगतानाच भाजपची नीती शेतकरी विरोधी आहे, असं त्यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI