AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam : ...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला, फेब्रुवारीपासून सुरू होता प्लान, पण... खळबळजनक माहिती समोर

Pahalgam : …तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला, फेब्रुवारीपासून सुरू होता प्लान, पण… खळबळजनक माहिती समोर

| Updated on: May 02, 2025 | 4:44 PM

दोन फेब्रुवारी रोजी पीओकेमधील रावलकोटमध्ये एक बैठक झाली. रावलकोटमध्ये लष्कर आणि जैश आणि हमास नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर लगेचच हाफिज सईदला पाकिस्तानी लष्कराच्या छावणी क्षेत्रात हलवलं, अशी सूत्रांची माहिती आहे.

पहलगाम हल्ल्याच्या संपूर्ण कटाची माहिती असणारं टुलकिट आढळलं असल्याची माहिती काल समोर आली होती. तर पहलगाम हल्ल्यासंदर्भात सापडलेल्या टुलकिटची एनआयकडून चौकशीही करण्यात आली. या टुलकिटमध्ये प्रवासाचा मार्ग आणि राहण्याच्या ठिकाणी माहिती होती. इतकंच नाहीतर सुरक्षा एजन्सींपासून कसा बचाव करावा, याची देखील रणनिती या टुलकिटमध्ये असल्याचे समोर आले होते. यानंतर आता आणखी एक माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यासाठी दहशतवाद्यांच्या फेब्रुवारीपासून बैठका सुरू होत्या, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, दहशतवादी आणि हमासच्या फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये बैठका झाल्यात. १५ एप्रिलरोजी दहशतवाद्यांकडून तीन ठिकाणी झडती घेण्यात आली होती. पण पोलीस ठाणेजवळ असल्यानं दहशतवाद्यांकडून आधीचा प्लॅन रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Published on: May 02, 2025 04:27 PM