Pahalgam Terror Attack : दुर्गम भाग, कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही; हल्ला झाला त्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
पहलगामच्या ज्या खोऱ्यात अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला करून ठार मारलं त्या बैसरन खोऱ्यात टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले आहेत.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यावेळी कोणत्या धर्माचे आहात? असा प्रश्न विचारत पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या. या हादरवून टाकणाऱ्या घटनेत 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात ही घटना घडली. या खोऱ्यात जाण्याचा रास्ता हा अत्यंत खडतर आहे. घोडेस्वारांना या ठिकाणी आता येण्यास बंदी केलेली असल्याने हा संपूर्ण प्रवास पायी करावा लागतो. ही दरी खूप खोल असल्याने हल्ला झाला त्यावेळी देखील जखमींना आणि मृतांना तेथून वर आणण्यासाठी स्थानिकांना अडचणीचे झाले होते. हा हल्ला ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणची सध्याची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी या खोऱ्यात पोहोचले आहेत.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

