Pahalgam Attack : पहलगामच्या दहशतवाद्यांना खायला घातलं, राहण्याची व्यवस्था केली, ‘त्या’ दोघांना NIA नं ठोकल्या बेड्या
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दोघांना अटक केली आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी एक भयावह हल्ला केला, ज्यामध्ये २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला तर १६ जण गंभीर जखमी झाले होते.
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यात राष्ट्रीय सुरक्षा संस्थेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. आज रविवारी, पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन जणांना एजन्सीने अटक केली. परवेझ अहमद आणि बशीर अहमद अशी या दोन आरोपींची नावे आहेत. ज्या दोघांना एआयएने बेड्या ठोकल्या ते दोघेही पहलगामचे रहिवासी आहेत. तपास यंत्रणेने असे सांगितले की, पहलगामच्या बटकोट येथील परवेझ अहमद जोथर आणि पहलगामच्या हिल पार्क येथील बशीर अहमद जोथर यांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या ३ दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे. दोघांनीही अशी माहिती दिली की पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित पाकिस्तानी नागरिक होते.