Pahalgam Terror Attack Updates : हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : जम्मू – कश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवारी सकाळी अतिरेक्यांनी अमानुष हल्ल्यात २७ पर्यटक ठार झाल्याचे उघडकीस आले आहे. जम्मू-कश्मीराल कलम ३७० रद्द केल्यानंतराचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ल्या असल्याचे म्हटले जात आहे.
पहलगाममध्ये झालेल्या कालच्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातूनच नव्हे तर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दहशतवाद्यांनी काल जम्मू काश्मीर येथे असलेल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार करून हल्ला केला. मुस्लिम आहात का? अशी विचारणा करून टार्गेटेड पद्धतीने हा हल्ला करण्यात आला. यात 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक स्थानिक आणि पर्यटक जखमी आहेत. या सगळ्या पर्यटकांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. काही रुग्णांवर अनंतनागमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. याचबरोबर सीआरपीएफ आणि एसटीएफच्या जवानांना देखील याठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. संपूर्ण परिसरात पेट्रोलिंग देखील करण्यात येत आहे.
दरम्यान, या भ्याड हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर मधील स्थानिक लोकांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे अनंतनागमधील सर्व दुकानं बंद असलेली बघायला मिळत आहेत.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट

असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
