Pahalgam Attack Update : मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील अतिरेक्यांना आज भारतीय लष्कराने घेरलं आहे.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना भारतीय लष्कराने घेरलेलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या सहा अतिरेक्यांच्या मागावर भारतीय लष्कर गेल्या आठवडाभरापासून होतं. आता या दहशतवाद्यांना घेरण्यात आलेलं आहे. ही जागा कोणती याबद्दलची माहिती सुरक्षेच्या कारणास्तव अजूनही गोपनीय ठेवण्यात आलेली आहे.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला घडवून आणत 26 पर्यटकांना निर्घृणपणे मारण्यात आलेलं होतं. त्यानंतर भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात होतं. संशयित अतिरेक्यांच्या घरांवर देखील याकाळात लष्कराने छापे मारले होते. त्यानंतर आज अखेर भारतीय लष्कराने हल्ल्यातील दहशदवाद्यांना घेरलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Published on: Apr 29, 2025 10:29 AM
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

