Pakistan Army Firing : पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी लष्कराकडून गोळीबार
LOC tension India Pakistan : पाकिस्तानी लष्कराच्या कुरघोड्या काही थांबत नसून सलग पाचव्या दिवशी सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या कुरघोड्या काही थांबत नसल्याचं बघायला मिळत आहे. सलग पाचव्या दिवशी लष्कराकडून सीमेवर गोळीबार करण्यात आलेला आहे. कुपवाडा आणि बारामुल्ला इथल्या नियंत्रण रेषेवर हा गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याकडून देखील पाकिस्तानच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.
1 एप्रिलला कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सुरुंग स्फोट आणि गोळीबार झाला. घुसखोरीसाठी पाकिस्तानी सैन्याकडून मदत झाली. त्यानंतर 22 आणि 23 एप्रिलला पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर तट्टापाणी सेक्टर, पुंछमध्ये गोळीबार. कोणतीही जीवितहानी नाही. 24 आणि 25 एप्रिलला कुपवाडा येथील लिपा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार झाला. अजूनही सगळ पाचव्या दिवशी पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

