India-Pakistan War : पाकला कडकी….भीक मागण्याची वेळ तरीही युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात अन्…
भारताकडून पाकला प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईनंतर पाकने इतर देशांकडे भीक मागण्यास सुरुवात केली आहे. एक ट्विट करत पाकिस्तानने इतर देशांकडून भीक मागितल्याचे पाहायला मिळतंय.
भारताच्या कारवाईनंतर पाककडून इतर देशांकडे भीक मागण्यास सुरूवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. जगातील अनेक देशांकडे पाकिस्तानने कर्ज मागितलं आहे. पाकिस्तानची आर्थिक आणि एकूणच परिस्थिती पाहता पाकिस्तान भारतासोबत फार काळ युद्ध करू शकत नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसतंय. तर भीक मागण्याची वेळ पाकिस्तानवर आली असतानाही युद्धाची खुमखुमी कायम असल्याचे पाकच्या हालचालींवरून दिसतंय. भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा शेअर बाजार देखील धाडकन खाली कोसळला आहे. यानंतर जागातील अनेक देशांपुढे पाकिस्तानने हात पसरले असून कर्ज मागितले असल्याची माहिती मिळतेय. पाकिस्तानने हे कर्ज युद्ध करण्यासाठी मागितलं असल्याचे बोलले जात आहे.
भारताने आमचं मोठं नुकसान केलं असल्याने आम्हाला आगाऊ कर्ज देण्याची मागणी पाकिस्तानने जगातील अनेक देशांकडे केली आहे. आमचं शेअर मार्केट कोसळलं आहे आणि आम्ही अत्यंत कठीण प्रसंगाचा सामना करत आहोत त्यामुळे अंतरराष्ट्रीय मित्र देशांनी आम्हाला मदतीचा हात पुढे करावा, असं पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने ट्विट केलंय.
Official account of the Ministry of Economic Affairs, Economic Affairs Division – Government of Pakistan posts a tweet, "Govt of Pakistan appeals to International Partners for more loans after heavy losses inflicted by enemy. Amid escalating war and stocks crash, we urge… pic.twitter.com/sPQ4HgL4UW
— ANI (@ANI) May 9, 2025
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?

