Hafiz Saeed : भारताचा श्वास बंद करणार, असं म्हणणाराच घाबरला… हाफीज सईदला घराबाहेर पडता येईना, पाकला धास्ती नेमकी कशाची?
भारताच्या भीतीने पाकिस्तानने लष्कर-ए- तैयबाचा प्रमुख हाफिज सईदची सुरक्षा वाढवली आहे. हाफिजला बाहेर निघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ISI आणि पाकिस्तान सरकारला भारताच्या प्रत्युत्तराची धडकी भरली आहे. भारत हाफिज सईदचा खात्मा करू शकतो, अशी पाकला भीती आहे.
भारताच्या भीतीने पाकिस्तानने लष्कर-ए- तैयबाचा प्रमुख हाफिज सईदची सुरक्षा वाढवली आहे. ISI आणि पाकिस्तान सरकारला भारताच्या प्रत्युत्तराची भीती आहे. भारत हाफिज सईदचा खात्मा करू शकतो अशी भीती पाकला वाटते आहे. पाक आर्मीच्या माजी अधिकाऱ्याकडे सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हाफिज सईद लाहोरमध्ये सरकारी सुरक्षेखाली राहत असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे. तर हाफिज सईदच्या घराखाली बंकर सारख्या सुविधांचा समावेश आहे. हाफिजच्या राहत्या जागेत मशिद, मदरसा, खाजगी उद्यान आणि एक भूमिगत बंकर आहे.
लाहोरमधील जोहर टाउन परिसरातल्या निवासस्थानाजवळ SSG कमांडो तैनात आहे. हाफिज भारताच्या निशाण्यावर असल्यामुळे त्याच्या हालचाल आणि सुरक्षेसंदर्भात सतर्कता वाढली आहे. भारतीय सैनेपेक्षा भारताच्या नेतृत्वापासून पाकला जास्त धोका आहे असं आबिद राव म्हणाले. पाकिस्तानी सेनातील निवृत्त अधिकारी आबिद रावने असं बेताल वक्तव्य केले तर वेळेनुसार पाकिस्तानवरील हल्ल्याचं संकट वाढतंय, असं पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय. अनेक देशांकडून भारत-पाकमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचही ख्वाजा आसिफ म्हणाले.
Published on: May 01, 2025 07:15 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
