AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hafiz Saeed : '...तर रक्ताचे पाट वाहतील', भारताच्या निर्णयानंतर दहशतवादी हाफिज सईदचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Hafiz Saeed : ‘…तर रक्ताचे पाट वाहतील’, भारताच्या निर्णयानंतर दहशतवादी हाफिज सईदचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Apr 24, 2025 | 5:16 PM
Share

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर पाकिस्तान दहशतवादी हाफिज सईदचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. 'तुम्ही म्हणता की तुम्ही पाकिस्तानचे पाणी रोखू, तुम्ही काश्मीरमध्ये धरणे बांधून पाणी थांबवू, तुम्हाला पाकिस्तानला नष्ट करायचे आहे, तुम्हाला सीपीईसी म्हणजेच चीन-पाकिस्तान कॉरिडॉरचे मनसुबे उधळायचे आहेत.', असं सईद म्हणतोय

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात 26 निष्पापांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानवर मोठी कारवाई करत मोदी सरकारने सिंधू जल करार तात्काळ स्थगित केला आहे. तसेच पाकिस्तान उच्चायुक्तालयातील संरक्षण आणि लष्करी सल्लागारांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तान घाबरला असून पाकिस्तानला धमकी देण्यासाठी दहशतवादी हाफिज सईदची मदत घेतली आहे. पाकिस्तान दहशतवादी हाफिज सईदचा जुना व्हिडिओ व्हायरल करून भारताला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर पाकिस्तान दहशतवादी हाफिज सईदचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये हाफिज सईद हा भारताला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दहशतवादी हाफिज सईद भारताविरोधात विष ओकत आहे. तो म्हणतोय, ‘तुम्ही पाकिस्तानचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू. नद्यांमध्ये रक्त वाहू लागेल.’, असं हाफिज सईद म्हणत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतंय.

Published on: Apr 24, 2025 05:16 PM