Pakistan ISI : हेर नोमान इलाही पाकिस्तानला गुप्त माहिती देत होता? इक्बाल काना-नोमान यांचं चॅट आलं समोर
Indian spy Noman Elahi ISI connection : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत भारतात आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. त्यातील पाकिस्तान आयएसआय हँडलर इक्बाल काना आणि हेर नोमान यांच्यातील चॅट समोर आले आहेत.
पाकिस्तान आयएसआय हँडलर इक्बाल काना आणि हेर नोमान यांच्यामधील चॅट समोर आलेले आहेत. या दोघांमधले व्हॉईस कॉलसुद्धा समोर आलेले आहेत. या दोघांमध्ये ऑपरेशन सिंदूरदरम्यान चर्चा झालेली होती. या दरम्यान त्यांच्यात झालेला संवाद आता समोर आला आहे. संभाषणात इक्बालला उत्तर दिल्यानंतर नोमान याने सगळे व्हॉईस चॅट डिलीट केले. नोमानकडून एकूण 6 भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आलेले आहेत. या सर्वांवर पाकिस्तानची एंट्री आहे. इतकंच नाही तर नोमानकडे पाकिस्तानातून आलेला एक संशयास्पद कागदही सापडलेला आहे.
दरम्यान, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. यापैकी हेर नोमान इलाही आणि ISI हँडलर इकबाल काना यांच्यात संवाद झाला होता. जेव्हा भारत पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवत होते तेव्हा हा संवाद झाला होता. त्यामुळे पानीपतचा हेर नोमान इलाही पाकिस्तानला गुप्त माहिती देत होता का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.