Indian Army : पाकिस्तानने वापरलेल्या मिसाईल, ड्रोनचं भारतीय लष्कराने भरवलं प्रदर्शन
Indian Army Missile Exhibition पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूर दरम्यान वापरलेले चीनी मिसाईल आणि तुर्की ड्रोनचे आता भारतीय लष्कराकडून प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे.
पाकिस्तानचा आयएसआय हँडलर इक्बाल काना आणि हेर नोमान यांच्यामधील चॅट आता समोर आलेले आहेत. तसंच या दोघांमधले व्हॉईस कॉल सुद्धा समोर आलेले आहेत. या दोघांमध्ये ऑपरेशन सिंदूरदरम्यान चर्चा झालेली होती.
तर दुसरीकडे पाकिस्तानने वापरलेल्या चीनी मिसाईल आणि तुर्की ड्रोनचे आता भारतीय लष्कराकडून तुकडे करण्यात आलेले आहेत. तसंच तुकडे पडलेल्या मिसाईलचं प्रदर्शन देखील भरवण्यात आलेलं आहे. भारतीय लष्कराकडून हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेले ड्रोन देखील भारताने हवेतच निष्क्रिय केलेले होते. भारत पाकिस्तानमधल्या संघर्षाच्या वेळी पाकिस्तानने डागलेली क्षेपणास्त्र भारताच्या एस-400 अॅंटी डिफेन्स सिस्टिमने निष्क्रिय केली. पाकिस्तानने पाठवलेले ड्रोन देखील भारताने हवेतच निकामी केले. याच पडलेल्या आणि निष्क्रिय केलेल्या ड्रोन आणि मिसाईलचं प्रदर्शन आता भारतीय सैन्याने प्रदर्शन भरवलं आहे.