Pahalgam Attack : पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड, दररोज बसतोय कोट्यवधींचा फटका
हवाई क्षेत्र बंद केल्याने पाकिस्तानला कोट्यवधी रुपयांचे हवाई महसूल बुडण्याची शक्यता आहे. जेव्हा एखादे विमान एखाद्या देशाच्या आकाशातून जाते तेव्हा त्याला ओव्हरफ्लाइट शुल्काच्या स्वरूपात पैसे द्यावे लागतात. आता भारतीय विमाने पाकिस्तानी आकाशातून उड्डाण करत नाहीत. यामुळे पाकिस्तानला ओव्हरफ्लाइट शुल्क मिळत नाही.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठे आणि कठोर निर्णय घेतले, ज्यात सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्यात आली आहे. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. दरम्यान, आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानसाठी हा निर्णय घेऊन आ बैल मुझे मार.. अशी स्वतःची गत करून घेतली आहे. पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर पाकिस्तानला दररोज 7 लाख डॉलरचा फटका बसल्याची माहिती मिळतेय. पाकिस्तानला वाटले की भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करून ते भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राचे नुकसान करू शकते. मात्र भारतासाठी समस्या निर्माण करण्याऐवजी, पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्याचे दिसून येते.
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट

