पाकड्यांची तंतरली… पाकला भारताकडून होणाऱ्या स्ट्राईकची धडकी, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला तयार….
भारताकडे २ विमानवाहू जहाजे आहेत तर पाकिस्तानकडे एकही नाही. भारताकडे १३ डिस्ट्रॉयर जहाजे आहेत, तर पाकिस्तानकडे एकही नाही. भारतीय नौदलाकडे एकूण २९३ लढाऊ आणि सहाय्यक जहाजे आहेत, तर पाकिस्तानची संपूर्ण नौदल केवळ १२१ संसाधनांपुरती मर्यादित आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान भारताशी युद्धात दोन हात करू शकेल?
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी एक भ्याड दहशतवादी हल्ला झाला.या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, बुधवारी पाकिस्तानने एक मोठा दावा करत असे म्हटले की, भारत पुढील २४ ते ३६ तासांत लष्करी कारवाई करू शकतो. पण पाकिस्तानच्या या विधानानंतर एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे जर युद्ध झालंच तर पाकिस्तान खरोखरच भारतासोबत युद्ध करू शकेल का? समुद्रात पाकिस्तानचे सैन्य भारतासमोर क्षुल्लक आहे. त्यामानाने भारतीय नौदलाची ताकद पाकिस्तानच्या दुप्पट असल्याचे दिसतेय. अशातच पाकिस्तानच्या नौदलाला भारताकडून होणाऱ्या स्ट्राईकची धडकी भरल्याची मोठी माहिती समोर येत आहे. युद्धासाठी आपल्याला तयार राहावं लागेल, असं वक्तव्य पाकिस्तानचे नौदल प्रमुख नाविद अश्रीफ यांनी करत भारताकडून होणाऱ्या स्ट्राईकची भिती त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट

