Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राची मोठी कबुली, जबाबात म्हणाली पाकच्या सुचनेनुसार….
युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्स अॅप चॅटमधून धक्कादायक खुलासे समोर आल्यानंतर तपासादरम्यान ज्योती मल्होत्राची डायरी समोर आली होती. आता तिच्या जबाबातून अनेक गोष्टी उघड होत आहेत.
हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करायची, असं स्वतः ज्योती मल्होत्रा म्हणाल्याचे समोर आले आहे. तिने दिलेल्या कबुली जबाबातून हे उघड झाले आहे. सुरू असलेल्या तपासादरम्यान ज्योती मल्होत्रा कबुली देताना असं म्हटली की, पाकिस्तानात मी शकीर आणि राणा शाहबाजला भेटली. तर शकीरचा नंबर जट रंधावा नावाने फोनमध्ये सेव्ह केल्याचेही ज्योती मल्होत्राच्या कबुली जबाबातून समोर आलंय. इतकंच नाहीतर देशविरोधी माहितीची देवाण-घेवाण ज्योती मल्होत्रा करत होती, असेही तिने म्हटलंय. यासह दिल्लीमध्ये दानिशला अनेक वेळा भेटल्याचाही उल्लेख तिच्या जबाबातून करण्यात आलाय. ‘मी २०२३ मध्ये पाकचा व्हिसा मिळवण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती. जिथे माझी भेट दानिशशी झाली. त्याचा मोबाईल नंबर घेऊन मी त्याच्याशी बोलू लागले. त्यानंतर मी दोनदा पाकिस्तानला गेली, मी तिथं हसनला भेटली. ज्याने माझी राहण्यासह जेवणाची व्यवस्था केली’, असं तिने जबाबात म्हटलंय.