Shahbaz Sharif : पाक वृत्तपत्राकडून शाहबाज शरीफची पोलखोल, हवाई दलाचे शौर्य दाखवण्यासाठी केलेले दावे सपशेल फेक
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ७-८ मे च्या रात्री पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. भारताने पाकिस्तानच्या या दहशतवादी तळांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्राने हल्ला केला होता.
पाकिस्तानी वृत्तपत्राकडून पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफचा खोटेपणा उघड झाला आहे. भारत पाकिस्तान हवाई दलाचे शौर्य दाखवण्यासाठी पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ याने केलेले दावे खोटे असल्याचे समोर आले आहे. टेलिग्राफचा बनावट फोटो सोशल मीडियावरही शेअर करण्यात आला आहे. तर पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री इशाक डारचा खोटारडेपणा पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमधूनच उघड करण्यात आला आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे भेदरलेला पाकिस्तान आता नवीन दावे करण्यात व्यस्त आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफपासून ते संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि परराष्ट्र मंत्री इशाक दारपर्यंत सर्वजण सतत एकामागून एक खोटे दावे करताना दिसत आहेत. दरम्यान, पाकचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी संसदेत सांगितले की, टेलिग्राफ वृत्तपत्राने पाकिस्तानी हवाई दलाच्या पराक्रमाची कबुली दिली आहे. मात्र पाकिस्तानी संसदेत इशाक दार यांनी केलेले भाषण आणि शाहबाज शरीफने हवाई दलाचे शौर्याचा केलाला दावा खोटा असल्याचे पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’नेच उघड केले.
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...

