पब्जी खेळताना 16 वर्षीय तरुण पडला दुसऱ्या मजल्यावरून, जखमी तरुणार उपचार

इमारतीवरुन तरुण पडल्याचं कळताच त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही धक्क्दायाक घटना पालघरच्या शिरगाव इथं घडली. पबजी गेम खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 16, 2022 | 9:35 AM

पबजीचे (PUBG Game) अनेक किस्से वारंवार समोर आलेले आहेत. नुकतीच नाशिकमधून पबजी संदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली होती. काही दिवसांपूर्वी नाशिकचा (From Nashik to Nanded) एक मुलगा पबजी खेळता खेळता नांदेडला पोहचला. या मुलाला पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. दरम्यान, त्यानंतर आता पालघर (Palghar News) मध्ये पबजी गेम खेळत असताना 16 वर्षीय तरुण दुसऱ्या मजल्यावरून खाली पडलाय. पब जी गेमच्या नादात निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून हा तरुण गंभीर जखमी झाला. इमारतीवरुन तरुण पडल्याचं कळताच त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही धक्क्दायाक घटना पालघरच्या शिरगाव इथं घडली. पबजी गेम खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेम खेळण्याच्या नादात सध्या तरुण इतके गुंग होऊन जातात की त्यांना कशाचच भान राहत नाही, हे या घटनेवरुन अधोरेखित झालंय. त्यामुळे गेमिंक करणाऱ्या तरुणांबाबत चिंता व्यक्त केली जातेय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें