Pandharpur : धक्कादायक… विठुरायाच्या भाविकांच्या भक्तीचा सौदा, तीर्थ म्हणून चंद्रभागेचं पाणी अन्….
पंढरपुरातून बीव्हीजी कंपनीला मंदिर सुरक्षा रक्षकाचा ठेका मिळाल्यापासून ही कंपनी सतत वादात सापडलेली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि प्रशासनाने या पूर्वीच्या घटनांवर कठोर कारवाई केली नसल्याने अशा घटना वाढत असल्याचे दिसत आहे.
पंढरपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. भाविकांना तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री केली जात आहे. बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा गोरख धंदा उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंढरपुरात बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून भाविकांच्या भक्तीचा सौदा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय भाविकांमध्ये संताप पाहायला मिळतोय. भाविकांकडून पैसे घेऊन चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून विक्री केली जात असल्याने भाविक अवाक् झालेत. तर मंदिर समितीकडे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकाचा हा धंदा सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाला आहे.
चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे महाद्वार घाटावरून नदीत उतरण्यास भाविकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. या ठिकाणी बॅरिकेटिंग लावून बिव्हीजी कंपनीचे कंत्राटी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत मात्र हे सुरक्षारक्षक नदीतील पाणी भाविकांना तीर्थ म्हणून विकत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

