Pankaja Munde : केज नगरपंचायतीत पंकजांचा धनंजय मुंडेंना चेकमेट, धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा?

धनंजय मुंडे यांना चेकमेट देत पंकजा मुंडे यांनी केज नगरपंचायत (Kej Nagarpanchayat Election) काबीज केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 26, 2022 | 8:12 PM

बीड : बीड मधील मुंडे भावा-बहिणीचा राजकीय वैर आजपर्यंत सर्वांनी पाहिलं आहे. कालच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला त्यानंतर पंकजा मुंडे यांना बोलताना भान राहत नाही अशी टीका धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आली. हे वार पलटवार नेहमी सुरूच असतात, त्यातच आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना चेकमेट दिलाय. धनंजय मुंडे यांना चेकमेट देत पंकजा मुंडे यांनी केज नगरपंचायत (Kej Nagarpanchayat Election) काबीज केली आहे. या नगपंचायतीत जनविकास आघाडीच्या 08 तर राष्ट्रवादी- 05, काँग्रेस- 03, स्वाभिमानी -01 अशा एकूण जागा 17 आहेत. केजमध्ये काँग्रेस आणि जनविकास आघाडी एकत्र येत सत्ता स्थापन करणार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें