… मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
पंकजा मुंडे यांनी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांसाठी प्रचार केला. त्यांनी नाशिकला देवभूमी संबोधत, कुंभमेळ्याच्या योग्य नियोजनासाठी भाजपचा महापौर आवश्यक असल्याचे सांगितले. महिलांना भावनिक आवाहन करताना त्या म्हणाल्या, "सकाळी कमळाला मतदान करा, मगच नवऱ्याला जेवण वाढा." १५ तारखेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शहरातील मतदारांना, विशेषतः महिलांना, भाजप उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी नाशिकला महाराष्ट्राची देवभूमी संबोधले.
नाशिकमध्ये येणारा कुंभमेळा (सिंहस्थ) आणि त्याच्या यशस्वी नियोजनासाठी भाजपचा महापौर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मुंडे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी भाजपला निवडून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी महिला मतदारांना एक भावनिक आवाहन केले. मतदानाच्या दिवशी सकाळी देवपूजा करून नाश्ता तयार करावा आणि तो झाकून ठेवावा. नवऱ्याला आणि घरातील सदस्यांना कमळाच्या चिन्हाला मतदान करण्यास सांगावे आणि त्यानंतरच भोजन वाढावे, असे त्या म्हणाल्या. १५ तारखेला भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतदान करून आशीर्वाद देण्याची विनंती त्यांनी केली.
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल

