Pankaja Munde Video : ‘बीड जिल्हा अत्यंत गुणाचा, आता अजितदादांना…’, पालकमंत्रीपदावरून काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
बीडचा पालकमंत्री पद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरून वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधलाय. तर आपलं वक्तव्य हे विचारलेल्या प्रश्नावर होतं असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिलंय.
महाराष्ट्रात सध्या कुठे आपला नेता पालकमंत्री झाला नाही म्हणून जाळपोळ केली जातेय. कुठे आरोपीच्या समर्थनात मोर्चे निघतायत. तर काही लोकप्रतिनिधी कमी मतांनी जिंकले म्हणून मतदारांनाच वेश्या असं म्हणत गद्दारीचा ठपका ठेवतायत. बीडमधल्या संतोष देशमुख हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्री पदावर ठेवू नका असं म्हणून अजितदादा गटासह भाजपमधूनही विरोधी सूर सुरू झाला. पर्यायाने धनंजय मुंडेचा पत्ता कट होऊन अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले आणि पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकत्व देण्यात आलं. मात्र जर बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिलीये. ‘मी बीडची लेक आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर आणखी आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासतील सर्वात जास्त विकासशील असा कार्यकाल राहिलेला आहे. हे कोणत्याही विचाराचा व्यक्ती मान्य करेल जे आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे आणि जालना मध्ये काम करण्यासाठी बिडमध्ये मला डबल लक्ष द्यावं लागेल’, असं पकंजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान बिड जिल्ह्याला फक्त राजकीय हेतूने बदनाम केले गेले माझा बिड जिल्हा अत्यंत गुणि जिल्हा असून त्याची प्रचिती आता पालकमंत्री झालेल्या अजित पवारांना येईल असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र

'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
