Gauri Garje Case : अनंत गर्जेच्या घरासमोर गौरी गर्जेवर अंत्यसंस्कार, दोन्ही कुटुंबांमध्ये बाचाबाची अन्…
पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे याला पत्नी गौरी गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी अटक झाली आहे. गौरीच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह थेट अनंत गर्जेच्या मूळ गावी नेऊन त्याच्या घरासमोरच अंत्यसंस्कार केले. यामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गौरीला न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे.
पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे याला पत्नी गौरी गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वरळीतील राहत्या घरी गौरी गर्जे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गौरीच्या संतप्त कुटुंबीयांनी तिचा मृतदेह अनंत गर्जेच्या मूळ गाव असलेल्या मोहोज देवडे (अहिल्यानगर जिल्हा, पाथर्डी तालुका) येथे नेला. तेथे अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. या अंत्यसंस्कारावेळी दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली. आत्महत्येपूर्वी गौरी आणि अनंत गर्जे यांच्यात भांडण झाले होते, त्यानंतर अनंत गर्जे कार्यक्रमासाठी बाहेर पडले होते. घरी परतल्यावर त्यांनी गौरीला मृत अवस्थेत पाहिले. अंजली दमानिया यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित करत गौरीला न्याय मिळण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

