Pankaja Munde : तर मुंडे साहेब देशातील फार मोठ्या पदावर असते; पंकजा मुंडेंनी दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा
Gopinath Munde death anniversary : दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज भगवान गडावर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.
आज मुंडे साहेब असते तर ते देशाच्या मोठ्या पदावर असते. तुम्ही त्यांना कुठे शोधता हे माहिती नाही, पण मी तुमच्यामध्ये त्यांना शोधते, अशा भावना मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. आज दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृति दिन आहे. दरवर्षी प्रमाणे परळीच्या पांगरी येथील गोपीनाथ गडावर यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह धनंजय मुंडे आणि संपूर्ण मुंडे कुटुंब या ठिकाणी उपस्थित होतं. यावेळी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, या कार्यक्रमांच्या माध्यमातील त्यांना जिवंत ठेवण्याचा आणि त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अपघाताने माणसे दुरावतात, अपघाताने माणसे एकत्र येतात. आज जर मुंडे साहेब असते तर देशातील फार मोठ्या पदावर नक्कीच असते, त्यांच्या सहकार्यांसोबत ते आपल्याला रोज दिसले असते. आज ११ वर्ष पूर्ण झाली आहेत, गावागावात मुंडे साहेबांची जयंती साजरी होते. हे आमचे भाग्य आहे, आमच्या परिवाराचे भाग्य आहे, असंही त्यांनी यावेळी म्हंटलं.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

