VIDEO : Breaking | पंकजा मुंडे समर्थकांनी प्रवीण दरेकरांचा ताफा अडवला
विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळाले नाहीये. यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजगी बघायला मिळते आहे. याचे पडसाद मराठवाड्यात विशेष: बीडमध्ये बघायला मिळत आहेत. बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवला आहे.
विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळाले नाहीये. यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजगी बघायला मिळते आहे. याचे पडसाद मराठवाड्यात विशेष: बीडमध्ये बघायला मिळत आहेत. बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवला आहे. पंकजा मुंडे यांनी मात्र या सगळ्यावर बोलणं टाळलं आहे. दोन दिवसांनी आपण भूमिका स्पष्ट करु, असे सांगत विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याची नाराजीच त्यांची व्यक्त केल्याचे दिसते आहे. आता पंकजा मुंडे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. पंकजा मुंडे यांच्याऐवजी गोपानीथ मुंडे यांच्या खंद्या समर्थक, ओबीसी महिला नेत्या आणि पिंपरी चिंचवडच्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

